Author: Pramod Kapoor
Languages: Marathi
Number Of Pages: 328
Binding: Hardcover
Package Dimensions: 9.1 x 7.0 x 1.2 inches
Release Date: 25-09-2019
Details: Product Description गांधींचं जीवन आणि त्यांचे आदर्श जगभरातील लोकांना प्रेरणादायी ठरले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतीमुळेच मोहनदास करमचंद गांधी लोकांना मोहात पाडतात. एका खट्याळ, मौजमजा करायला आवडणार्या मुलामध्ये हळूहळू परिवर्तन होत होत तो महात्मापदापर्यंत कसा पोहोचला, याचा अत्यंत आत्मीयतेनं केलेला अभ्यास म्हणजेच प्रस्तुत पुस्तक गांधी - सचित्र जीवनदर्शन. क्रमसुसंगत मजकूर आणि सोबतच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विलक्षण गुंतागुंत, त्यांचं यशापयश, समकालीनांसोबतचं जवळचं नातं आणि त्याच वेळेस स्वतःच्या कुटुंबीयांसोबत अवघडलेले नातेसंबंध या सगळ्या गोष्टी वाचकांसमोर उलगडतात. About the Author प्रमोद कपूर हे व्यवसायाने प्रकाशक असून, त्यांनी 1978 साली रोली बुक्स ही प्रकाशन संस्था स्थापन केली. त्यांना चित्रांचा आणि छायाचित्रांचा संग्रह करण्याची आवड आहे. आत्तापर्यंतच्या देदीप्यमान कारकिर्दीत त्यांनी स्वत: कित्येक पुस्तकं लिहिली असून, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय प्रकाशनक्षेत्राचा नकाशाच बदलून टाकणारी पुस्तकं प्रकाशित केल्याबद्दल त्यांना 2016 साली शेवलियर डी ला लीजन डि’ऑनर (नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर) हा फ्रान्समधील अत्युच्च नागरी आणि लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. लेखक म्हणून त्यांचं पहिलं पुस्तक गांधी - सचित्र जीवनदर्शन हे त्यांच्या अनेक वर्षं कष्ट करून केलेल्या संशोधनाचं फलित आहे.