Author: Gabriel Garcia Marquez
Languages: marathi
Number Of Pages: 380
Binding: Paperback
Package Dimensions: 8.5 x 5.5 x 0.3 inches
Release Date: 20-09-2021
Details: Product Description फ्लोरेंतिनो अरिसाशी असलेलं नातं फर्मिना डासाने क्षणात तोडून टाकलं आणि डॉ. हुवेनाल उर्बिनोशी लग्न केलं. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षं फ्लोरेंतिनो अनेकींच्या मिठीत शिरला खरा; परंतु त्याचं प्रेम एकमेव होतं - फर्मिना. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा फर्मिनाला पुन्हा मागणी घालायची ही शपथच त्याने जणू घेतली होती. जेव्हा फर्मिनाचा नवरा मरण पावला, तत्क्षणी - त्या रात्री समोर आलेल्या संधीवर फ्लोरेंतिनो अरिसाने झडप घातली. एक्कावन्न वर्षं, नऊ महिने आणि चार दिवस एवढा प्रदीर्घ काळ मधे सरून गेला होता. आता परिस्थिती वेगळी होती. आयुष्याच्या संध्यासमयी या जुन्या प्रेमिकांमधलं प्रेम पुन्हा बहरेल?. About the Author गॅब्रिअल गार्सिया मार्केझ यांच्या नावावर आइज ऑफ ब्लू डॉग (1947), लीफ स्टॉर्म (1955), नो वन राइट्स टू कर्नल (1958), वन हन्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड (1967), इनोसन्ट एरेन्डिरा अँड अदर स्टोरीज् (1972), लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा (1985), द जनरल इन हिज लॅबिरिन्थ (1989), स्ट्रेंज पिलग्रिम्स (1992) आणि ऑफ लव्ह अँड अदर डेमॉन्स (1994) यांसारख्या अनेक कथासंग्रह आणि कादंबर्या जमा आहेत. एल एस्पेक्टडोर या कोलंबियन वृत्तपत्रासाठी त्यांनी वार्ताहर म्हणून काम पाहिले आहे, तसेच रोम, पॅरिस, बार्सिलोना, कॅरॅकस आणि न्यू यॉर्क येथे फॉरेन करस्पॉन्डन्ट म्हणून काम पाहिले आहे. 1982 साली त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.